Monday, March 22, 2021

WORLD WATER DAY

                       💧 *जलप्रतिज्ञा*💧                         

भारत माझा देश आहे. इथली जलसंपत्ती जपणे माझे कर्तव्य आहे. पाणी हे जीवन आहे. तसेच पाणी हे मौल्यवान आहे. पाणी फुकट मिळते ही धारणा मी मनातून काढून टाकेन. घटत्या पाणी उपलब्धतेची मला संपूर्ण जाणीव आहे. पाण्यावर माझ्या इतकाच इतरांचाही हक्क आहे.

समन्वयाने सर्वांसाठी पाणी ही भावना मी सतत जोपासेन. पाणी वापर संस्थासाठीचे कायद्याचे ज्ञान घेणे,

समन्यायाने सर्वांना पाणी देणे यांस माझे प्राधान्य राहील. धरणांमध्ये ज्यांची घरे, शेती पाण्याखाली गेली आहे.

त्यांच्याविषयी मी कृतज्ञ राहीन. सिंचन व्यवस्थापनेतील नव्या सुधारणांचा उपयोग करून

पाण्याचा काटकसरीने वापर करीन. सांडपाण्याच्या प्रश्नाची तीव्रता मला समजली असून जीवनदायिनी प्रदूषित होणार नाही यासाठी मी व्यक्तीश: प्रयत्न करीन. सर्वांसाठी पाणी या प्रक्रियेत मी माझ्या बंधु-भगिनींचा सहभाग मिळवून यासाठी विविध पातळीवर काम करणारे शासन, संस्था आणि व्यक्ति यांना मी सदैव सहकार्य करण्याची मी प्रतिज्ञा करतो. यातच माझ्या राष्ट्राचे हीत सामावले आहे.

“भारत माता कि जय”

लक्षात ठेवा जल म्हणजे जीवन आहे,

आणि जी गोष्ट आपण तयार करू शकत नाही त्याचा गैर वापर करण्याचा आपल्याला अधिकार नाही. 

No comments:

Post a Comment